उरुळी कांचन, (पुणे) : हातात पिशवी, कपाळावर टिळा, सोबत आसमंतांत घुमनारा महाकालचा आवाज, देहभान विसरून उज्जैनला जाण्यासाठी दंग झालेले महिला व पुरुष भाविक यांना सोडवण्यासाठी नातेवाईकांनी केलेली उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर गर्दी, अशा या भक्तिमय वातावरणात अडीच हजार भाविक उरुळी कांचन रेल्वे स्थानकावरून उज्जैनच्या दिशेने आज सोमवारी (ता. 26) सकाळी रवाना झाले.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून उज्जैन या ठिकाणी जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते. शिरूर-हवेली मतदार संघातील नागरिकांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे. या उदात्त हेतूने मोफत श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरुळी कांचन रेल्वे स्थानकाला जत्रेला स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच नातेवाईकांनी भाविकांना सोडवण्यासाठी रेल्वेस्थानकासह परिसरात मोठी गर्दी केली होती.
उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर रेल्वे दाखल झाल्यानंतर माऊली आबा कटके यांच्या हस्ते रेल्वेची पूजा करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव, प्रसाद सातव, पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुजित चौधरी, शिवसेना नेते काळुराम मेमाणे, निलेश काळभोर, अनिल सातव, संतोष भोसले, रमेश भोसले, प्रताप कांचन, सागर नाना कांचन, राजेंद्र आढाव, प्रकाश कटके तसेच पुर्व हवेलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावण मासानिमित्त शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी मोफत श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रा काढण्यात आली आहे. पूर्व हवेलीतील सोलापूर रोडवरील कदमवाकवस्तीपासून ते उरुळी कांचन परिसरातील हजारो नागरिकांनी यावेळी दर्शनासाठी जाण्यासाठी उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. नागरीकांमध्ये यामुळे उत्साह संचारला आहे.
View this post on Instagram
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. आपल्या मतदार संघातील बांधवांना हिंदू तीर्थस्थळ दर्शन व्हावे म्हणून माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून मतदार संघातील बांधवांसाठी श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रेचे आयोजन केले. विशेष म्हणजे यात्रेसाठी पक्षिय निकष न लावता सर्वांना संधी देण्यात आली आहे. या यात्रेकरूंची व्यवस्था बघण्यासाठी स्वयंसेवक यात्रेकरूंबरोबर आहेत. ही यात्रा पूर्णतः मोफत असून यात्रेच्या कालखंडात चहा नाष्टा जेवण, तसेच राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे माऊली आबा कटके यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये आनंदाची भावना व्यक्त झाली आहे.
देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कोणी सोबत नसल्याने आणि परेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन उदात्त हेतूने मोफत श्री महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके म्हणाले, ” शिरूर हवेलीतील तब्बल 30 ते 35 हजार भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला आहे. मांडवगण, वडगाव रासाई या गटातील पहिली ट्रेन जाऊन यशस्वी झाली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील दोन ते अडीच हजार भाविक उत्साहाच्या वातावरणात भाविक जाण्यासाठी आनंदाच्या तयारीत आहे. फाउंडेशनच्या वतीने केलेले आयोजन सर्व संयोजकांनी केले. जाणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा..
याबाबत बोलताना पेठ येथील पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी म्हणाले, ” पूर्व हवेलीसह परिसरातील 30 ते 40 हजार भाविक भक्त दर्शनासाठी घेऊन जाण्याचे माऊली आबांचे नियोजन आहे. पूर्व हवेलीत सर्वसामान्य जनतेसाठी स्व खर्चातून अनेक उपक्रम राबवले आहेत. यामागील काळात व यापुढील काळात कोणाकडूनहि अशा ट्रीपच नियोजन होणार नाही. या ट्रीपमुळे पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.