धानोरी : विश्रांतीवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रिया वसंत सिटी येथील एका टपरीचे दुकान फोडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथे प्रिया वसंत सिटी परिसरात आदित्य हॉटेल आहे. या हॉटेल परिसरात एक टपरी आहे. दरम्यान, तीन अज्ञात चोरटयांनी या टपरी फोडून त्यातील मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टपरीच्या पाहणी केली. त्यावेळी टपरी दुकान फोडले होते.
दरम्यान, तिन चोरटे लोहगाव रोडच्या दिशेने पळून गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपींचा पाठलाग केला असता गोल चौक येथे तीन व्यक्ती एक्टिवा गाडीवर लोहगावच्या दिशेने जाताना दिसले. त्यावेळी पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल मिळून आला. आरोपीना मुद्द्यामालासह पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.