शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिराज अशोक पवार यांची तर उपाध्यक्षपदी पोपटराव रामदास भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या शेतकरी पॅनलने १९-१ च्या फरकाने बाजी मारली.
या निवडणुकीत नियोजन समितीचे पंडित दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र नरवडे, प्रकाश पवार, सभापती मोनिकाताई हरगुडे इतर अनेक पदाधिकारी यांच्या यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्यानंतर आज गुरुवारी (ता.१७) अध्यक्षपदी ऋषिराज पवार यांची तर उपाध्यक्षपदी पोपटराव भुजबळ यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांचे वडील रावसाहेब दादा पवार यांच्या संकल्पनेतून घोडगंगा साखर कारखाना साकारलेला आहे. हा साखर कारखाना आता शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा कणा बनला आहे.
शिरूर तालुक्यातून सुमारे १८ हजार शेतकरी सभासद यांच्या निधीमधून २५वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या कारखान्यावर पूर्वीपासून आमदार पवार यांची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी २० जागा जिंकून शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आमदार पवार यांनी विरोधकांना धूळ चारली आहे.