सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे येथील स्मशानभूमी जवळील तलावामध्ये मस्कु मारुती झेंडे (वय-४७, रा. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. झेंडे हे त्यांच्या राहत्या १७ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी कविता म्हस्कु झेंडे यांनी २० ऑगस्ट रोजी सासवड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास झेंडे यांनी सांगितले कि, भाऊ म्हस्कु झेंडे माझी घराजवळच त्याच्या कुटंबासह राहण्यास आहे. दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी म्हस्कु झेंडे हा राहत्या घरातुन ढुमेवाडीचे दिशेने निघुन गेला. मात्र तो परत घरी आला नाही. त्यामुळे त्याची पत्नी कविता यांनी याबाबत २० ऑगस्ट रोजी सासवड पोलीस ठाण्यात मिशिंगचा गुन्हा दाखल केला आहे..
दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ शिवा कोकरे यांना म्हस्कु झेंडे याचा मृतदेह स्मषानभुमीजवळील तलावामध्ये पाण्यात तरंगत असल्याचे आढळले. पुढील तपास पोलीस हवालदार लडकत करत आहे.