छत्रपती संभाजीनगर : लाँड्री बॅगवर ठेवलेले ५५ हजार रुपये घरातील तीन मोलकरणीने चोरून नेले. ही घटना सिंधी कॉलनी येथे घडली. फिर्यादी सुमित अशोक मोटवानी (४०, रा. १७६, सिंधी कॉलनी) यांच्या घरात माया संतोष गवारे (३२, रा. बीडबायपास, जिजाऊ नगर), प्रीती विजय साबळे (४०, रा. रमानगर) आणि उज्वला देवचंद गांगुर्डे (६५) या तिघीजणी मोलकरीण म्हणून कामाला आहेत. मोटवानी यांनी लॉड्री बॅगवर ५५ हजार रुपयांची रोकड ठेवली होती. ही रक्कम या तिन्ही मोलकरणीने चोरून नेल्याची तक्रार मोटवानी यांनी दिल्यावरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.