दिनेश सोनवणे
दौंड : कुरकुंभ (ता.दौंड) येथील फुलचंद देविदास ढोरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड तालुका व्यापार व उद्योग समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पदाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या उद्धारसाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचबरोबर महासंघाने दिलेली जबाबदारी योग्य रितीने व प्रमाणिकपणे पार पाडले. असे ढोरे यांनी सांगितले.
महासंघाचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते फुलचंद ढोरे यांना रविवार (दि.१३) नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.