पुणे : पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील मस्तानी दरवाज्यासमोर असलेली हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटविण्यात यावी, अशी मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.
आनंद दवे म्हणाले की, शनिवारवाडा बांधण्यात आला होता. त्यावेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा दर्गा किंवा पीर नव्हता. मात्र आपल्या देशातून इंग्रज जाताना त्यांनी अनेक गोष्टींची मोडतोड केली.
त्याचाच एक भाग म्हणून इंग्रजांनी शनिवारवाडा परिसरातील मस्तानी दरवाजा समोरील हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा बांधला.
आता या घटनेला अनेक वर्ष होऊन गेली आहेत. त्यानंतर आम्ही पुणे महापालिका व पुरातत्त्व विभागाकडे या दर्ग्याबाबत माहिती घेतली. तेव्हा अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकाराच्या नोंदी नसल्याचे समोर आले आहे. असे आनंद दवे यांनी सांगितले आहे.
त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाबाबत १५ दिवसांत माहिती मिळावी, अशी मागणी पुणे महापालिका व पुरातत्त्व विभागाकडे आम्ही केली आहे.
त्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका मांडणार आहोत. मात्र शनिवारवाडा परिसरातील हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटविला गेला पाहिजे. अशी आमची मागणी आनंद दवे यांनी केली आहे.