लोणी काळभोर, (पुणे) : तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीमधील अशासकीय सदस्यांची यादी न आल्याने मागील काही दिवसापासून समितीची बैठक झाली नाही. मात्र कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी थेट भेट घ्यावी असे आवाहन हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केले आहे.
पुणे प्राईम न्यूजमध्ये हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्या बाबतचे आदेश अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीवर स्पष्टीकरण देताना तृप्ती कोलते यांनी वरील आवाहन केले आहे.
याबाबत बोलताना कोलते म्हणाल्या, अशासकीय सदस्य नसल्याने विविध समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या नाहीत. यात हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा समावेश आहे. पालकमंत्री महोदयांकडून प्रशासकीय सदस्यांच्या याद्या मिळताच तालुक्याची नवीन भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करून या समितीच्या नियमित बैठका घेतल्या जातील.
दरम्यान, अशासकीय सदस्य नसल्याने बैठक घेता आली नव्हती. बैठक घेता आली नसली तरी कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी थेट तक्रारी तहसील कार्यालयाला कळवाव्यात त्याची थेट दखल घेतली जाईल असेहि तहसीलदार कोलते म्हणाल्या.