नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात राजधानी दिल्लीत सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण पाहिला मिळाली. त्यानंतर दिल्लीत सोने 400 रुपयांनी स्वस्त होऊन दर 72,750 रुपये झाला. बुधवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात हा सोन्याचा दर 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’नुसार, शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 72,750 झाला. तर चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढून 84,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला, जो मागील बंदमध्ये 83,200 रुपये प्रति किलो होता. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरून 72,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात तो 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
दरम्यान, पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 70,080 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 65,180 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 82,900 रुपयांवर गेले आहेत. असे असले तरीदेखील सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांचा कल वाढल्याचे दिसत आहे.