पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. सध्या काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे बळीराजाने शेतीकामांना वेग दिला आहे. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई आणि कोकण या भागालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याता पावसाचा अंदाज आहे. तसेच अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत. महत्त्वाचे म्हणजे, जुलै महिन्याच्या सुरुवातील पावसाचा जोर कायम होता. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
महाराष्ट्रासह, दिल्ली, केरळ, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.