-विजय लोखंडे
वाघोली : कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलेश ज्ञानोबा रिकामे यांची मंगळवारी (दि.13 ऑगस्ट) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच विनायक गायकवाड, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश मदने, सचिन गायकवाड, संदिप गायकवाड, स्वप्नील नितनवरे, निशा भोर, स्वाती गायकवाड, चैत्राली गायकवाड, प्रिया गायकवाड, शीतल भाडळे आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
रमेश मदने यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक कोलवडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. यामध्ये निलेश ज्ञानोबा रिकामे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल निलेश रिकामे यांची वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत कोलवडी गावाला वळसा घालीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार बाजार समितीचे प्रभारी सभापती प्रशांत काळभोर, माजी सभापती प्रकाश जगताप, कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, पिडिसिसीचे संचालक विकास दांगट, भाजपाचे नेते रोहिदास उंद्रे, यशवंत कारखान्याचे संचालक रामदास गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.
कोलवडी-साष्टे गावची वाटचाल सदयस्थितीत प्रगतीच्या मार्गांवर आहे. यापुढे उपसरपंच पदावर काम करताना गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. नागरिकांचे रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
– निलेश रिकामे, नवनिर्वाचित उपसरपंच-ग्रामपंचायत कोलवडी-साष्टे