छत्रपती संभाजीनगर : निलेश राणे यांनी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे त्याच्यावर आता टीका होऊ लागली आहे. अशातच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी निलेश राणे यांना धारेवर धरलं आहे. नितेश राणे हा शेंबड पोर त्याला महत्व देऊ नका.चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला मारलं असतं. राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती, असे इम्तियाज जलील यांनी यांनी कडक शब्दात सुनावले आहे.
नेमकं काय प्रकरण…
नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित केलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन पोलीस अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला होता. ‘सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही’, असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असे सुद्धा नितेश राणे यांनी म्हटले होते.
आपल्या वक्तव्याचे पुन्हा समर्थन..
नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड चर्चा झाली. मात्र, बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले होते. पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे मी माझे कर्तव्य समजतो, असे नितेश राणे म्हणाले.