पुणे : घरकामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज पळवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
तक्रारदार महिला पाषाणमधील सोमेश्वरवाडी भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी घरकामासाठी एक कामगार ठेवला होता. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात काम करीत होता. ही महिला घरात नसल्याची संधी साधून त्याने कपाटातील हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याच्यानंतर तो कामगार न आल्याने महिलेचा संशय बळावला. त्यांनी कपाटाची पाहणी केली. तेव्हा कपाटातील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.