यवत : दौंड तालुक्यातील नागरिकांच्या विविध विभागांशी संबंधित प्रलंबित विषयांसंबंधी महाराजस्व अभियान अंतर्गत मंडल कार्यालय निहाय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती करणे, आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती व KYC करणे, नवीन शिधापत्रिका, दुरुस्ती व शिधापत्रिका विभाजन करणे, विद्यार्थी रहिवाशी दाखला, कुणबी तसेच इतर सर्व जातीचे दाखले पुरविणे, आयुष्यमान भारत कार्ड वाटप करणे, फेरफार अदालत, वारस नोंद संबंधित प्रलंबित प्रकरणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच महसूल विभागाशी संबधित विविध योजना राबविणे, यांसह विविध विभागांशी संबंधित प्रलंबित अर्जाचा निपटारा करणे आदि प्रमुख सुविधा शिबिरात देण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये पंचायत समिती, दौंड नगरपरिषद, कृषी विभाग, भूमी अभिलेख, वन विभाग, सहायक निबंधक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सर्व महा ई सेवा केंद्र व सेतू सुविधा केंद्रे आदि विभाग सहभागी होणार आहे
शिबिराचे दिनांक व मंडळ कार्यालय खालील प्रमाणे
दि. १४ ऑगस्ट २०२४ – देऊळगाव राजे, रावणगाव – मंडल अधिकारी कार्यालय
दि. २२ ऑगस्ट २०२४ – दौंड, पाटस – मंडल अधिकारी कार्यालय
दि. २९ ऑगस्ट २०२४ – वरवंड, केडगाव – मंडल अधिकारी कार्यालय
दि. ०५ सप्टेंबर २०२४ – राहू, यवत – मंडल अधिकारी कार्यालय
दि. १२ सप्टेंबर २०२४ – दौंड नगरपरिषद
नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आमदार राहुल कुल यांचे मध्यवर्ती संपर्क कार्यालय (७० ३८ ६६ ७७ ९९ ) येथे संपर्क साधावा.