सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या घटनेमुळे सांगली शहर हादरलं आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाल्याचं समोर आलं आहे. कवठेमहांकाळमध्ये ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडालीच नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्लेखोराने मात्र या प्रकारानंतर धूम ठोकली आहे.
मोबाइल शॉपीमध्ये झाला हल्ला कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला. मात्र, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यामुळे गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी रात्री घडली. परंतु, उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद केली गेली नव्हती.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे अभिजित पुत्र आहेत. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे. सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला आहे.