नवी दिल्ली : कोणताही मोबाईल फोन असो त्यात सिमकार्ड हे गरजेचे असते. पण आता ई-सिमचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ई-सिम एक इलेक्ट्रॉनिक सिम असून, त्यासाठी कोणत्याही नॉर्मल कार्डची गरज नसते. eSIM हे सॉफ्टवेअर आधारित आहे. पण तरीही eSIM चा जास्त वापर केला जात नसल्याचे दिसत आहे.
सध्या सॅमसंगच्या सर्व प्रीमियम फोन्स आणि आयफोन मॉडेल्समध्ये ई-सिमची सुविधा उलब्ध आहे. तुमच्यापैकी बरेच जण eSIM वापरत असतील, पण तुम्हाला माहीत आहे का की ई-सिम पुन्हा नॉर्मल सिममध्ये बदलताही येऊ शकते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नेटवर्क कंपनीच्या स्टोअरमध्ये जावे लागेल. त्या ठिकाणी जाताना शासनाचे ओळखपत्र सोबत घ्यावे लागेल. यानंतर, स्टोअर तुमचा सिम कार्ड क्रमांक आणि ओळखपत्र तपासून काही रक्कम घेईल. त्यानंतर ते तुम्हाला सिमकार्ड देतील.
हे सिमकार्ड अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमचे ई-सिम बंद केले जाईल. नवीन सिम मिळाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या फोनमध्ये घालावे लागेल आणि टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून ते सिम अॅक्टिव्हेट करावे लागणार आहे.