पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘फ़्रेंड्स ऑफ बीजेपी’ अभियानाची सुरुवात करण्यात आली . पुणे विभागातील या अभियानाची सुरुवात आज (१४ नोव्हेंबर) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हस्ते करण्यात आली. तसेच ‘फ़्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या पोस्टरचे देखील अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, गणेशजी बिडकर आदी प्रमुख उपस्थितीत होते.
समाजामध्ये अनेक नागरिक असतात की जे थेट राजकीय पक्षात काम करण्याचे टाळतात. मात्र त्यांना भारतीय जनता पक्षासाठी काम करण्याची इच्छा असते. अशा नागरिकांना जोडण्याचे काम ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या अभियानासाठी सतीश निकम हे संयोजकांच्या भूमिकेत राहाणार असून नागरिकांनी ७०३०७७६१६१ या क्रमांक डायल करून या अभियानात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र संयोजक श्रीकांत थिटे व पुणे जिल्हा सोशल मीडियाचे संयोजक जनार्दन दांडगे यांनी केले आहे. यावेळी लोणी काळभोर भाजपाचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर व उरुळी कांचन येथील शुभम वलटे उपस्थित होते.