बंगळुरू : गेल्या काही महिन्यांपासून अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना बंगळुरूमधून घडली असून तेथील एका महिलेच्या विनयभंग करण्यात आला आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. एक व्यक्ती मागून येऊन त्या महिलेला मिठी मारत जबरदस्तीने किस करुन तिथून पसार झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिथे राजस्थानची एक महिला रोजच्या प्रमाणे पहाटे 5 वाजता फिरायला जात होती आणि तिच्या मैत्रिणींची वाट पाहत होती. तेवढ्यात मागून एक माणूस त्या महिलेजवळ आला. यानंतर त्याने तिला मिठी मारली. आणि त्या महिलेचे बळजबरीने चुंबन घेतले आणि नंतर तिथून पळ काढला आहे.
माहिती मिळताच कोननकुंटे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा केली. सध्या पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना डीसीपी दक्षिण लोकेश जगलासर म्हणाले की, एका महिलेचा छळ झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून कोननकुंटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. आमच्यासाठी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विनयभंगाच्या अशा घटना रोखण्यासाठी ज्या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे, त्या ठिकाणी गस्त वाढवण्यात येणार आहे.
आरोपींविरुद्ध बीएनएस 76, 78, 79 (विनयभंग, पाठलाग व विवस्त्र करणे, लैंगिक छळ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरु आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.