आपल्या शरीराला प्रोटीनसह व्हिटॅमिनचीही गरज असते. आपलं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी प्रोटीन आणि व्हिटॅमिन महत्त्वाची भूमिका बजावतात. वेगवेगळे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात वेगवेगळे कार्याच्या माध्यमातून आपली मानसिक, शारीरिक क्षमता वाढवत असतात.
आपल्या देशात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असूनही ‘व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेने मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. ‘व्हिटॅमिन डी’च्या अभावाने शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. देशातील सुमारे 65-70 टक्के भारतीयांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दिसून येते. इतर 15 टक्के लोकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ आवश्यक प्रमाणात नसल्याचेही समोर आले आहे. ‘व्हिटॅमिन डी’ कॅल्शियमचे अवशोषण आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर हे तत्त्व त्वचेत संश्लेषित होते. हे स्टेरॉयड हॉर्मोन आहे जे शरीरात काल्पनिक रुपात प्रत्येक कोशिकाला प्रभावित करते. ‘व्हिटॅमिन डी’ च्या अधिक कमतरतेने डायबिटीज, कोरोनरी, हृदयाचे आरोग्य, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.