पुणे: राज्यात उन्हाळ्याची (Pune Weather) चाहूल लागली असून पुण्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवार, 9 मार्च 2026 रोजी पुणे शहरात कडक ऊन राहण्याची शक्यता आहे.
आज पुण्याचे कमाल तापमान 37°C ते 38°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. पहाटे आणि रात्री हवेत थोडा गारवा असून किमान तापमान 21°C ते 22°C च्या आसपास नोंदवले गेले आहे. पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक आज 149 (मध्यम) श्रेणीत आहे. धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस आकाश निरभ्र राहील, ज्यामुळे उन्हाचा चटका आणखी वाढू शकतो. 10 आणि 11 मार्च रोजी पारा 38 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ‘हीट वेव्ह’चा (उष्णतेची लाट) इशारा देण्यात आला असला, तरी पुण्यात सध्या तरी तशी स्थिती नाही. मात्र, दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, बाहेर जाताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा आणि सुती कपड्यांना प्राधान्य द्यावे.







