Maharashtra Weather Update : मुंबई : महाराष्ट्र सध्या गारठला आहे. मात्र, आता येत्या ४८ तासाच हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे.
मुंबईसह उपनगर, ठाणे, कोकण आणि विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार, 2 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशाच्या हवामानावर याचा परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत राज्यात देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.