Akola | अकोला : अकोल्यातील पारस गावात सोसाट्याचा वार आणि पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरातील टिनशेडवर कडूनिंबाचे जूने झाड कोसळले. शेडखाली असलेली सुमारे चाळीस ते पन्नास नागरिक त्या खाली दबले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.
तर अनेक जण अजूनही शेडखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. रात्री ही घटनाा घडल्याने पाऊस सुरु असल्याने आणि अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. प्रशासन आणि गावकऱ्यांकडून मदतकार्य सुरु आहे. अशी माहिती बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांनी प्रसार माध्यमांना दिली .
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस हे गाव आहे. इथे बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थानाचं मंदिर आहे. आज रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी लोकांची प्रचंड गर्दी होती. तसेच संस्थान परिसरात टिनाचं मोठे शेड असल्यामुळे इथेही चाळीस ते पन्नास लोक आरतीसाठी उपस्थित होते.
दरम्यान अचानक सायंकाळी पाऊस आणि वादळीवारा सुरू झाला. यावेळी मंदिराच्या संस्थांना लागून मोठ कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून मंदिराच्या टिनाच्या शेडवर कोसळले.
रविवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस…
रविवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग खूप असल्याने मंदीराच्या आवारात असलेले कडूनिंबाचे जूने झाड भाविकांच्या अंगावर कोसळले. पावसामुळे मंदीराच्या मार्गावर अनेक वृक्ष कोलमडून पडले असल्याने घटनास्थळी जाण्यासाठी अडचणी येत होत्या.परिणामी मदतकार्याला विलंब होत होता.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा सजग मदत कार्याला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आमदार रणधीर सावरकर यांना घटनास्थळी पाठवून ताबडतोब माहिती व मदत कार्याची माहिती घेण्यास सांगितले. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला मदत कार्याचे आदेश दिले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Farmer News : चिया कडधान्यातून शेतकरी मालामाल ; महाराष्ट्रातील पहिलेच पीक
Good News | राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून २४ शेतकऱ्यांना नवीन विहीर