नवी दिल्ली : सध्या WhatsApp चा जगभरात वापर वाढला आहे. हे WhatsApp बेस्ट असे ‘इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म’ आहे. या WhatsApp च्या माध्यमातून मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगसह डॉक्युमेंट्सही शेअर करता येतात. कंपनीकडून वेळोवेळी काही डिव्हाईसेससाठी प्लॅटफॉर्मचा सपोर्टही बंद केला जातो.
कंपनीने आता iPhone युजर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांत WhatsApp अनेक जुन्या iPhone चा सपोर्ट बंद करणार आहे. या कारणास्तव, कंपनीने बीटा टेस्टर्सना या फोनवर नवीन अपडेट डाउनलोड करणे थांबवले आहे. मात्र, या फोनवर व्हॉट्सॲप ऑफलाइन होण्याची शेवटची तारीख 5 मे ही असणार आहे. WhatsApp युजर्ससाठी त्यांच्या फोनमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट इन्स्टॉल करावे लागणार आहे.
तसेच ज्या युजर्संनी त्यांच्या आयफोनची बीटा टेस्टसाठी नोंदणी केली आहे. त्यांच्या फोनमध्ये iOS 15.1 किंवा त्यावरील व्हर्जन असणे गरजेचे आहे. हा बदल WABetaInfo ने पाहिला आहे. जर तुमचा फोन iOS 14 वर काम करत असेल तर तुम्हालाही त्याचा फटका बसणार आहे.