WhatsApp New Feature : नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने अल्पावधीतच जगभरात आपली लोकप्रियता उच्च पातळीवर नेली आहे. सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप्सपैकी एक असलेलं व्हॉट्सअॅप आता आपल्या जीवनाचा एक मोठा भाग झालं आहे. केवळ मित्रांना किंवा कुटुंबीयांना मेसेज करण्यासाठीच नाही, तर ऑफिसच्या कामासाठी देखील कित्येक ठिकाणी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप कित्येक नवीन फीचर्स देखील आणत आहे. शेअर लोकेशनमुळे युजर कुठेही असला तरी योग्य ठिकाणी जातो. त्याशिवाय पैसे पाठवू शकतो.
WhatsApp is rolling out a search message by date feature for the web client!
A new search message by date feature is finally available to some users who previously joined the official beta program of WhatsApp Web!https://t.co/tRNejdXi3Y pic.twitter.com/WFDZNUvVpz
— WABetaInfo (@WABetaInfo) November 7, 2023
आता व्हॉट्सअॅपने आणखी एका नवीन फीचरवर काम सुरू केलं आहे. याच्या मदतीने जुने मेसेज शोधणं हे अगदी सोप्पं होणार आहे. जुने मेसेज शोधण्यासाठी व्हॉट्सअॅपने सर्च बारमध्ये एक कॅलेंडर अॅड केलं आहे. यामुळे एखाद्या ठराविक तारखेचे मेसेज आपल्याला शोधता येणार आहेत. अनेकदा हवे ते मेसेज मिळत नसल्याने तरूण वर्गाची प्रचंड चिड चिड होते. 80 टक्के तरूणांचा हाच प्रॉब्लेम असतो. मात्र आता वापरकर्त्यांची आवड पाहून व्हॉट्सअॅप त्यात बदल करत आहे. व्हॉट्सअॅप त्यांच्या प्रत्येक अपडेट्स विषयी माहिती देत असते. कंपनीने आपल्या एक्स हँडलवरून या नवीन फीचरची माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा 2.2348.50 या व्हर्जनवर उपलब्ध आहे. चाचणी झाल्यानंतर लवकरच हे सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.