नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Western Digital ने आपली वेस्टर्न डिजिटल (डब्ल्यूडी) WD My Passport आणि Sandisk Professional G- Drive ArmorATD 2.5 इंच पोर्टेबल हार्ड डिस्क लाँच केला आहे. हा एक साधासुधा पोर्टेबल हार्ड डिस्क नसून, जगातील सर्वांत मोठ्या स्टोरेज स्पेसचा डिव्हाईस असणार आहे. याची स्टोरेज क्षमता 6TB पर्यंत असणार आहे.
अल्ट्रा स्लिम डिझाइन असून, त्यात 6TB पर्यंत स्टोरेज म्हणजे 6 कॉम्प्युटरचा डेटा फक्त एका हार्ड ड्राईव्हमध्ये सहज साठवता येऊ शकतो. युजर्सना त्यांच्या एक्स्ट्रिम व्हिडिओंपासून ते महत्त्वाच्या फाईल्स आणि डेटापर्यंत सर्व काही सेव्ह करता येणार आहे. यात मेटल डिझाईन असून, USB Type-C टेक्नॉलॉजी असणार आहे. हार्ड ड्राईव्हमध्ये 256-बिट्स AES हार्डवेअर एनक्रिप्शन व्यतिरिक्त पासवर्ड सिक्युरीटीसह तुमचा वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो.
या पोर्टेबल डिव्हाईसच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या स्टोरेजची गरज पूर्ण करता येणार आहे. कारण, यामध्ये भलीमोठी स्टोरेज देण्यात आली आहे. शॉक रेझिस्टन्स व्यतिरिक्त यात IP54 रेन आणि डस्ट रेझिस्टन्सचाही यातून फायदा होणार आहे.