नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi कडून एक नाहीतर तीन नवे स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. Xiaomi कंपनी भारतात Redmi Note 14 5G सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही स्मार्टफोन सीरीज 9 डिसेंबरला लाँच केली जाणार आहे.
Xiaomi च्या स्मार्टफोन सीरिजमध्ये तीन फोन असणार आहेत. त्यामध्ये Redmi Note 14, Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ हे तिन्ही फोन यावर्षी सप्टेंबरमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. भारतात आता हे फोन्स आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्ससह लाँच केले जाणार आहेत. Redmi Note 14 सीरीज चीनमध्ये आधीच लाँच झाली आहे. भारतात कंपनी काही बदलांसह हे फोन लाँच करण्याची शक्यता आहे.
Redmi Note 14 मध्ये, तुम्हाला 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिव्हाईस चीनमध्ये Android 14 वर आधारित HyperOS सह लाँच करण्यात आला होता. या मालिकेतील Note 14 मध्ये Dimensity 7025 Ultra प्रोसेसर असेल, Note 14 Pro मध्ये Dimensity 7300 असणार आहे.
चीनमध्ये Note 14 ची किंमत सुमारे 14,300 रुपयांपासून सुरू होते. तर Pro सीरीजची किंमत 17,900 रुपयांपासून सुरू होते आणि Note 14 Pro+ ची किंमत अंदाजे 23,900 रुपयांपासून सुरू होणार आहे.