नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी TCL ने नवीन TCL 4k QLED C69B अल्ट्रा HD स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. कंपनीने 43 इंच आणि 65 इंच अशा दोन वेगवेगळ्या साईजमध्ये टीव्ही आणले आहेत. यामध्ये टी-स्क्रीन प्रो टेक्नॉलॉजीसह अनेक बेस्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत.
TCL कंपनीचा हा नवा टीव्ही 600 nits च्या HDR ब्राइटनेस आणि उत्तम ऑडिओसाठी ONKYO 2.1ch सबवूफरसह मिळत आहे. यात 32GB पर्यंत स्टोरेज स्पेस असून, जे इंडस्ट्री स्टँडर्ड 16GB स्टोरेज स्पेसपेक्षा 2 पटीने जास्त आहे. दोन्ही टीव्ही अल्ट्रा एचडी (4K) 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करणाऱ्या डिस्प्ले पॅनल्ससह येतात. हा टीव्ही Google TV OS वर चालतो. यामुळे ग्राहकांना त्यांचे आवडते OTT प्लॅटफॉर्म शोधता येऊ शकेल.
यामध्ये मोठा साऊंड देण्यात आला असून, डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट आहे. जो AiPQ प्रोसेसरवर काम करतो. यात एकूण साऊंड आउटपुट 30W आहे. टीव्ही टी-स्क्रीन प्रो तंत्रज्ञानासह येतो. यात 120Hz गेम एक्सिलरेटर तर आहेच शिवाय, गेम मास्टर एम्बेडही आहे. ज्यामुळे एक चांगला गेमिंग अनुभव घेता येणार आहे.