नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Samsung ने नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Galaxy A16 5G हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन युरोपमध्ये आणला आहे. जो A15 5G चा समान असा असणार आहे. आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत कंपनीने यात मोठी स्क्रीन, बॅटरी आणि इतर फीचर्स दिले आहेत.
Galaxy A16 5G मध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यात Exynos 1330 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. Samsung Galaxy A16 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. Micro SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1.5TB पर्यंत वाढवता येते.
स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोन IP54 रेटिंगसह येतो. यात 5G सपोर्ट आहे. हँडसेटला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Android 14 वर आधारित One UI 6 वर हँडसेट काम करतो. यात 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 5MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. कंपनीने 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 249 युरो (अंदाजे 22960 रुपये) आहे.