Robot Killed Man : नवी दिल्ली : आजकाल सगळ जग माणासने रोबोटीक केलं आहे. सर्व गोष्टी मशीनवर चालत असताना आता त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रात एआय आणि रोबोटचं वर्चस्व दिसून येत आहे. मात्र, दक्षिण कोरियामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका रोबोटने चक्क माणसाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रोबोटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा रोबोट एका व्हेजिटेबल फॅक्टरीमध्ये काम करत होता. मिरच्यांचे बॉक्स एका कन्व्हेयर बेल्टवर ठेऊन पुढे पाठवणे हे त्याचं काम होतं. त्याचवेळी रोबोटिक्स कंपनीतील एक कर्मचारी त्या रोबोटचे सेन्सर तपासण्यासाठी तिथे आला.
यावेळी रोबोटने त्या व्यक्तीलाही मिरचीचा बॉक्स समजलं, आणि त्याला पकडून उचललं. त्या कर्मचाऱ्याने प्रतिकार करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्, रोबोटच्या ताकदीपुढे तो हरला. इतर मिरचीच्या बॉक्सप्रमाणेच या व्यक्तीलाही रोबोटने कन्व्हेयर बेल्टवर ढकलून दिलं. यामुळे या व्यक्तीच्या चेहऱ्याला आणि छातीला मार बसला. यातच त्याचा मृत्यू झाला.
या रोबोटच्या सेन्सरमध्ये काही त्रुटी झाल्यामुळे त्याला मिरचीचा बॉक्स आणि माणूस यातील फरक समजला नाही असे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियामध्ये या वर्षातील झालेली ही दुसरी अशी घटना आहे. ज्यामध्ये मशीनच्या चुकीमुळे मानवाचा मृत्यू झाला आहे. चुका या माणसाकडूनच होतात, मशीनकडून नाही; असं आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं असेल. त्यामुळे मशीनवर आपण किती अवलंबून रहायचं याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.