नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme कडून नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले जाणार आहेत. Narzo सीरीजचे हे स्मार्टफोन्स असणार आहेत. Narzo ची ही नवीन सीरीज 9 एप्रिल 2025 ला भारतात आणली जाणार असल्याची माहिती आहे.
Realme च्या या स्मार्टफोन सीरीजमध्ये Realme Narzo 80 Pro 5G आणि Narzo 80x 5G हे स्मार्टफोन्स आणले जाणार आहेत. हे दोन्ही फोन्स Realme Narzo 70 Pro आणि Narzo 70x च्या अपग्रेड केलेल्या व्हर्जन असणार आहेत. कंपनीकडून या स्मार्टफोन्समध्ये 6000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला जाणार आहे. या स्मार्टफोन्सची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाईनही ऑर्डर करता येणार आहे.
Realme Narzo 80 Pro 5G ची किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. तर, Realme Narzo 80x 5G ची किंमत 13000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोन्समध्ये चांगला प्रोसेसर आणि बॅटरीही देण्यात येणार आहे. Narzo 80x 5G ला MediaTek Dimensity 6400 SoC असेल तर Narzo 80 Pro 5G ला MediaTek Dimensity 7400 SoC मिळणार आहे. याचा बॅटरी बॅकअप देखील चांगला असणार आहे.
कंपनीकडून दमदार बॅटरी मिळणार
या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, Narzo 80 Pro 5G मध्ये 80W फास्ट चार्जिंग उपलब्ध असणार आहे. तर Narzo 80x 5G मध्ये 45W फास्ट चार्जिंग दिला जाणार आहे. Narzo 80 Pro 5G ला 4500 nits पीक ब्राइटनेस, 2500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 120Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे.