नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपला GT सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme GT 7 Pro असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि हा पहिला फोन आहे जो Qualcomm Snapdragon 8 Gen Elite प्रोसेसरसह उपलब्ध करण्यात आला आहे.
Realme GT 7 Pro या स्मार्टफोनमध्ये 6500 mAh पॉवरफुल बॅटरीसह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन मार्स एक्सप्लोरेशन एडिशन, स्टार ट्रेल टायटॅनियम आणि लाईट डोमेन व्हाईट या तीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन 12GB आणि 16GB रॅम मॉडेलमध्ये मिळत आहे.
फोनच्या 12GB RAM + 256GB मॉडेलची किंमत CNY 3,699 (अंदाजे रुपये 43,800) आहे. 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 3,999 (अंदाजे 47,400 रुपये) आहे. त्याच्या 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 3,899 (अंदाजे रुपये 46,200), 16GB + 512GB व्हेरिएंट CNY 4,299 (अंदाजे 50,900 रुपये) आहे. तर, 1TB मॉडेलची किंमत CNY 4,799 (सुमारे 56,900 भारतीय रुपये) आहे.
काय आहेत Realme GT 7 Pro चे फीचर्स?
Realme GT 7 Pro मध्ये 6.78 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले असून, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट मिळत आहे. डिस्प्ले 6,000 nits ची शिखर ब्राइटनेस, 1264×2780 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 450 ppi पिक्सेल मिळत आहे. या स्मार्टफोनचे वजन 222.8 ग्रॅम असून, डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68/IP69 रेटिंगसह मिळत आहे.