नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता Realme ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 14T 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 50MP कॅमेराही दिला गेला आहे.
Realme च्या 14T 5G स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. Realme 14T 5G मध्ये MediaTek चा Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB RAM आहे. याला IP69 रेटिंग दिला गेला आहे, यामुळे पाण्याच्या नुकसानापासून मोठ्या प्रमाणात संरक्षित असणार आहे. Realme 14T 5G मध्ये 6000 mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme 14T 5G च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 17999 रुपये तर 8GB + 256 GB मॉडेलची किंमत 19999 रुपये आहे. दोन्ही फोन Realme.com, Flipkart आणि ऑफलाईन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाईन खरेदीवर कंपनीकडून एक हजार रुपयांचा मोठा डिस्काउंटही देण्यात आला आहे.
Realme 14T 5G मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. हे 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट देते, जे 2000 निट्सची कमाल ब्राईटनेस देते. Realme 14T 5G मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 6300 6nm प्रोसेसरही असणार आहे.