नवी दिल्ली : वियरेबल बँड Pebble ने स्मार्टवॉच लाँच केले आहे. जे जगातील सर्वात स्लिम स्मार्टवॉच असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन पेबल रॉयलमध्ये 1.43 सर्वांत स्लीम स्मार्टवॉच इंचाचा वर्तुळाकार AMOLED डिस्प्लेसह लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप ऑप्शनसह आला आहे.
या स्मार्टवॉचमध्ये IP67 रेटिंग, अनेक हेल्थ आणि फिटनेस ट्रॅक असलेले फीचर्स आहेत. नवीन पेबल रोयाल स्मार्टवॉचची किंमत 4,299 रुपये आहे. पेबल स्मार्टवॉच कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून व्हिस्की ब्राऊन, कोबाल्ट ब्लू आणि पाईन ग्रीन रंगात खरेदी केले जाऊ शकते.
पेबल रोयालमध्ये लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप ऑप्शनसह एक वर्तुळाकार स्टेनलेस स्टील डायल आहे. या पेबल स्मार्टवॉचमध्ये अनेक वॉच फेससह 1.43 इंचाचा वर्तुळाकार AMOLED ऑलवेज ऑन डिस्प्ले आहे. स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे आणि यात बिल्ट-इन व्हॉईस असिस्टंटचा सपोर्टदेखील आहे.
स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यावर 5 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ मिळते. पेबल रोयालमध्ये हेल्थ ट्रॅकिंग सुविधा देण्यात आली आहे. यात हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 सेन्सर, स्लिप मॉनिटर, स्मार्ट कॅल्युक्युलेटर आणि एक स्टेप पेडोमीटरचा समावेश आहे.