Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांचा दणका; बारामतीतील रद्द झालेला व्यापारी मेळावा २२ मार्च रोजी होणार…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 March 2024, 8:37

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी बारामतीमध्ये विविध मेळाव्यांचे आयोजन केले होते. पैकी व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द झाला. आम्हाला मेळाव्याला येणे शक्य नसल्याचे पत्र व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर या घटनेची चर्चा झाली. रद्द झालेल्या व्यापारी मेळाव्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वक्तव्य केले. त्यानंतर आता त्यांच्याच उपस्थितीमध्ये व्यापारी मेळावा घेण्याचा निर्णय बारामती येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता बारामतीतील श्री महावीर भवन या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

आम्हाला मेळाव्याला येणे शक्य नसल्याचे पत्र व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहरात सोमवारी होणारा व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आला होता. ‘पूर्वी असे कधी घडले नव्हते’, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे हा मेळावा रद्द करण्यासाठी बड्या नेत्याचा दबाव होता, अशी कुजबूज बारामतीत सुरू झाली. दरम्यान, व्यापाऱ्यांशी त्यांच्या प्रश्नांसाठी मी अनेक वेळा चर्चा केली, परंतु ‘आम्हाला जमणार नाही’ असे गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी कधीच कळवले नव्हते. हे पहिल्यांदा घडले. त्यांना बहुधा कशाचीतरी चिंता वाटत असावी. त्यामुळे कार्यक्रम न घेतलेला बरा, असे त्यांना वाटले असावे. त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायचे नाही असे ठरवले, त्याची मला खंत वाटते, असा तपशील शरद पवार यांनी वकिलांच्या मेळाव्यात उघड केला होता.

दरम्यान हा मेळावा रद्द केलेला नव्हता, तर तीन दिवसांत सर्व व्यापाऱ्यांपर्यंत निरोप जाणे शक्य नव्हते या मेळाव्याला व्यापाऱ्यांची पुरेशी उपस्थिती राहिली नसती त्यामुळे मेळावा नंतर घेण्याचे ठरले होते, असा खुलासा व्यापारी बांधवांनी केला. कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे गैरसमज निर्माण झाला असेही यावेळेस नमूद करण्यात आले.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बद्दल आदराचीच भावना असल्याचेही व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. 22 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता बारामतीतील श्री महावीर भवन या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर माजी नगराध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर यांच्या निवासस्थानी व्यापारी मेळाव्याबाबत पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा व्यापारी मेळावा २२ मार्चला आयोजित करण्यात येणार आहे, असे जवाहर शहा यांनी स्पष्ट केले. यापूर्वी व्यापारी मेळाव्याबाबत नियोजित बैठक घेऊन निर्णय वेळेत न झाल्यामुळे मेळाव्याला उशीर झाला, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, माजी नगरसेवक सुभाष ढोले, राहुल शहा वाघोलीकर, बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी कर्वे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी, नरेंद्र गुजराती, स्वप्नील मुथा, शैलेश साळुंखे, धवल वाघोलीकर उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

मोठी बातमी! आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहवीज प्रकल्पांना सरकारकडून गिफ्ट; प्रति युनिट दीड रुपये अनुदान देणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp