नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने नवीन रेनो सीरीज भारतात लाँच केली आहे. चीनमध्ये ही सीरीज आधीच लाँच करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. Reno 13 आणि Reno 13 Pro असे हे स्मार्टफोन्स आहेत.
Oppo च्या या दोन मॉडेलमधील मुख्य फरक म्हणजे कॅमेरा फीचर्स आणि बॅटरी. Reno 13 Pro मॉडेलमध्ये 5800mAh बॅटरी देण्यात आली तर Reno 13 मॉडेलमध्ये 5600mAh बॅटरी असणार आहे. Reno 13 Series 5G मध्ये एरोस्पेस-ग्रेड ॲल्युमिनियम फ्रेम आणि एक-पीस मागील काचेचे पॅनेल असणार आहे. याव्यतिरिक्त, ते कॉर्निंग गोरिला ग्लास 7i सह संरक्षित असेल. हा फोन मजबूत आणि हटके दिसू शकतो. या सर्व गोष्टी एकत्र करून फोनला प्रीमियम लूक देण्यात आला आहे.
Reno 13 सीरीजमध्ये AI Livephoto, AI अनब्लर आणि AI रिफ्लेक्शन रिमूव्हरसारखी अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. विशेषतः Reno 13 Pro मध्ये 50MP 3.5x periscope telephoto camera असणार आहे. याच्या मदतीने 120x पर्यंत डिजिटल झूम करता येणार आहे.
Reno 13 सीरीजची किंमत 37,999 पासून सुरू होणार आहे. Reno 13 च्या बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 37,999 असण्याची अपेक्षा आहे.