नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या सर्व स्मार्टफोन्सच्या डिस्प्लेवर लाईफटाईम वॉरंटी जाहीर केली आहे. त्यामुळे जर तुमचा OnePlus स्मार्टफोन ग्रीन लाईनच्या समस्येमुळे खराब झाला असेल तर कंपनी ते फ्रीमध्ये रिपेअर करेल.
One Plus च्या अनेक युजर्सनी वनप्लस स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाईनबद्दल तक्रार केली होती. ग्रीन लाईन समस्येच्या बाबतीत, युजर्सकडे फक्त दोन पर्याय असणार आहेत. त्यामध्ये युजर्सना डिस्प्ले बदलून घ्यावा लागला की पैसे द्यावे लागत होते. पण, आता हे सर्व वॉरंटीमध्ये होणार आहे. आता डिस्प्ले बदलण्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
सध्या ग्रीन लाईनची समस्या ही मोठी समस्या आहे. कारण ज्या फोनची वॉरंटी संपली आहे अशा फोनमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून आली. ग्रीन लाईनच्या लाईफटाईम वॉरंटी अंतर्गत केवळ नवीन स्मार्टफोनच नाही तर जुने फोन्सही समाविष्ट केले जातील. कंपनीने म्हटले आहे की, 2026 पर्यंत ते त्यांच्या सर्व्हिस सेंटर्सची संख्या 50 टक्क्यांनी वाढवतील. यासोबतच कंपनी आपले डिस्प्ले तंत्रज्ञान सुधारण्यावर काम करत आहे.