नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. त्यात OnePlus ने अखेर आपल्या बहुप्रतिक्षित OnePlus 13 स्मार्टफोनची लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. हा नवा फोन OnePlus 12 चा पुढचं व्हर्जन असणार आहे. हा पहिला स्मार्टफोन असेल जो स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर काम करेल.
OnePlus 13 स्मार्टफोन चीनमध्ये 31 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. कंपनीने चीनमध्ये हा फोन प्री-बुक करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. पण हा फोन भारतात कधी लाँच केला जाणार याची माहिती अद्याप कंपनीने दिली नाही. OnePlus 13 हा फोन तीन कलरमध्ये मिळत आहे. ‘व्हाइट डॉन’, ‘ब्लू मोमेंट’ आणि ‘ऑब्सिडियन सिक्रेट’, अशा कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
असे जरी असले तरी OnePlus 13 बद्दल अजून जास्त माहिती मिळाली नाही. पण काही लीकवरून समोर आले आहे की, यात 6.82-इंच 2K 120Hz BOE X2 स्क्रीन असणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर काम करेल, जो खूप वेगवान आणि पॉवरफुल असा असणार आहे.