मुंबई : सध्या WhatsApp, Instagram, Facebook यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढताना दिसत आहे. जर तुम्ही इन्स्टाग्राम युजर्स असाल तर आता कंपनीने तुमच्यासाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. याचा फायदा तुम्हाला होणार आहे.
इन्स्टाग्रामच्या कंटाळवाण्या फीडमुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. इन्स्टाग्राम आता एका फीचरवर काम करत आहे, ज्यानंतर तुमचे फीड कंटाळवाणे अर्थात बोरिंग होणार नाही. कंपनीकडूनही याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकत्याच झालेल्या बदलाबद्दल विचारण्यात आले, ज्याची बहुतेक लोकांना माहिती नव्हती.
तेव्हा मोसेरी यांनी सांगितले की, ‘इन्स्टाग्रामने ‘रग पुल’ नावाचे फीचर बंद केले आहे. हे फीचर युजर्सला इंटरफेस (UI) फीचर होते, ज्यामुळे युजर्सने ॲप उघडताच फीड आपोआप रिफ्रेश होत होते. आता युजर्सला Instagram चे फीड बोरिंग वाटणार नाही. त्या दृष्टीने कंपनीकडून विशेष तयारीही केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.