Meta Ray-Ban Display Smart Glasses: मेटा कंपनीने मेटा कनेक्ट इव्हेंट (17 सप्टेंबर 2025) मध्ये Meta Ray-Ban Display Smart Glasses नावाचे स्मार्ट चष्मे सादर केले आहेत. हे चष्मे इन-बिल्ट डिस्प्लेसह येतात, ज्यामुळे मोबाईल किंवा स्मार्टवॉचमध्ये जशा सूचना पाहता येतात तश्या याच्या डिस्प्लेवरही पाहता येणार आहेत.

या स्मार्ट चष्म्यांमध्ये काय आहे खास?
डिस्प्ले: उजव्या काचेवर स्क्रीन असून, त्यावर तुम्ही मेसेज वाचू शकता, नकाशा पाहू शकता, फोटो किंवा म्युझिक कंट्रोल करू शकता.
कंट्रोल: हाताचे इशारे वापरून चष्मा नियंत्रित करता येतो. यासाठी Neural Wristband दिले आहे, जे हाताच्या हालचाली ओळखते.
जेस्चर कंट्रोल: अंगठा आणि बोटाच्या हालचालींनी अॅप्स किंवा फंक्शन्स निवडता येतात. हवेत हात हलवून व्हॉल्युम वाढवता/कमी करता येतो.
AI सहाय्य: मेटा एआयला प्रश्न विचारता येतो. Voice Assistant चालू करण्यासाठी दोनदा थंब टॅप करता येतो.
लाईव्ह कॅप्शन Live Captions: प्रत्यक्ष बोललेले शब्द स्क्रीनवर दिसतात, जसे टीव्हीवर सबटायटल्स दिसतात तसे स्क्रीनवर दिसतात.
व्हिडिओ कॉलिंग: कॉल दरम्यान समोरच्या व्यक्तीला पाहता येते आणि त्यांना तुमचे मत सांगता येते. तुम्ही बोलून किंवा लिहून उत्तर देऊ शकता.
तांत्रिक वैशिष्ट्ये:
- 600×600 पिक्सेल रिझोल्यूशन
- 20° फील्ड ऑफ व्ह्यू
- 30 ते 5,000 निट्स ब्राइटनेस
- 12MP कॅमेरा
- 6 तासांची बॅटरी लाइफ (चार्जिंग केसने 4 वेळा चार्ज करता येतो)
- Wristband ची बॅटरी 18 तास टिकते
सॉफ्टवेअर सपोर्ट:
सुरुवातीला Facebook Messenger, WhatsApp आणि Spotify ला सपोर्ट
Instagram फक्त डायरेक्ट मेसेजसाठी
वर्षाअखेरपर्यंत Reels पाहण्याचाही पर्याय उपलब्ध होणार
किंमत किती आहे?
- विक्री सुरू: 30 सप्टेंबर 2025
- किंमत: 799 डॉलर (सुमारे 70,269)
मेटा (Meta) चे हे स्मार्ट ग्लास मोबाईलच्या अनेक कामांची जागा घेऊ शकतात. डिस्प्ले, एआय सहाय्यक, जेस्चर कंट्रोल आणि लाईव्ह कॅप्शन्स यामुळे हे चष्मे भविष्याची झलक देणारे ठरू शकतात.







