नवी दिल्ली : अनेकांना मोबाईलवर लाईव्ह टीव्ही पाहणे आवडते. त्यापैकी तुम्हीदेखील असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने Android युजर्ससाठी BSNL Live TV लाँच केला आहे. या अॅपच्या माध्यमातून मोफत टीव्ही पाहता येणार आहे.
BSNL Live TV हे अॅप Google Play Store वरून अगदी मोफत डाउनलोड करता येणार आहे. BSNL Live TV ॲप खास मनोरंजनासाठी तयार करण्यात आले आहे. हे ॲप WeConnect सह पार्टनरशिपमध्ये डेव्हलोप करण्यात आले आहे. या ॲपवर तुम्ही सर्व प्रकारचे टीव्ही चॅनेल मोफत पाहू शकता. या वर्षाच्या सुरुवातीला BSNL ने आपली इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (IPTV) सेवा फायबरद्वारे सुरू केली, ज्याची किंमत प्रति महिना फक्त 130 रुपये आहे.
BSNL ची ही सेवा रेग्युलर सेट-टॉप बॉक्सची गरज दूर करते, जरी BSNL ने याच्या लाँचिंगबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. बीएसएनएलच्या परवडणाऱ्या प्लॅनने मोठ्या प्रमाणात नवीन ग्राहकांना आकर्षित केले आहे.