नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी अशी ओळख असलेल्या रिलायन्स जिओकडून अनेक नवनवे प्लॅन आणले जात आहेत. काही नवीन सेवाही जोडल्या जात आहे. त्यात कंपनीकडून रिचार्ज प्लॅनच्या किंमतीतील बदलांचाही समावेश आहे. सध्या जिओने देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा सुरू केली आहे.
Jio चे तीन प्रीपेड प्लॅन हे फायद्याचे ठरत आहेत. ज्यात दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. जिओचा 1799 रुपयांचा प्लॅन बेस्ट असा ठरत आहे. यामध्ये अनेक सर्व्हिस दिल्या जात आहेत. ज्यामध्ये Jio Hotstar सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. आता कंपनीने ते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. रिचार्ज प्लॅनची वैधता 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ आता या प्लॅनचे फायदे 15 एप्रिलपर्यंत मिळू शकतात.
या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 3GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि अमर्यादित 5G डेटा मिळतो. त्याची वैधता 28 दिवस आहे. यासोबतच 3 महिन्यांसाठी JioCinema (Hotstar Mobile) चा मोफत अॅक्सेस मिळत आहे. याशिवाय 50GB JioAICloud स्टोरेजही मोफत दिले जात आहे.
जिओचा 1199 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, 100 SMS/दिवस आणि अमर्यादित 5G डेटा देखील येतो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये JioHotstar मोबाईल आणि 50GB JioAICloud स्टोरेजचे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट असणार आहे.