नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऍप्स् लाँच केले जात आहेत. त्यात आता अँड्रॉइडवर प्रॅन्क करण्यासाठी सर्वाधिक वापर आवाज बदलणाऱ्या अॅप्सचा केला जात आहे. या अॅप्सच्या मदतीने कॉल करताना तुम्ही तुमचा आवाज बदलू शकता. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत जे कॉलच्या वेळी तुमचा आवाज बदलू शकतात.
अँड्रॉइडमध्ये अनेक जबरदस्त अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने अनेक नवंनव्या गोष्टी करता येतात. यातील एक अॅप मॅजिक कॉल व्हॉईस चेंजर अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही रियल टाईममध्ये आपला आवाज बदलू शकता. या अॅपचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप डाउनलोड करावे लागेल. MagicCall – Voice Changer App असे या ऍपचे नाव असून, ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पुरुष, महिला, लहान मूल किंवा कार्टूनच्या आवाजातदेखील संवाद साधू शकता.
तसेच अनोळखी कॉलवर तुमची ओळख लपवून ठेवू शकता. इतकेच नव्हे तर कॉलवर बोलताना बॅकग्राऊंड साऊंड बदलण्याचा पर्यायदेखील मिळतो. म्हणजे तुम्ही कॉलवर ट्राफिक जॅम, म्युजिक कॉन्सर्टमध्ये अडकल्याचे देखील भासवू शकता. विशेष म्हणजे कॉल करण्याआधी तुमचा आवाज समोरच्याला कसा ऐकू जाणार याचे उदाहरणदेखील मिळते. त्यामुळे जर तुम्हालाही तुमचा आवाज फोनवरून कोणाला कळू द्यायचा नसेल तर तुम्हीही या ऍपचा वापर करू शकता.