पुणे : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत. आपल्या ग्राहकांची गरज पाहून अनेक टेक कंपन्या आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत आहे. त्यात सध्या वायरलेस ब्लूटूथ हेडफोनची क्रेझ चांगलीच वाढताना दिसत आहे. पण असे काही ब्लूटूथ हेडफोन आहेत ते आपल्यासाठी चांगलेच फायद्याचे ठरू शकतात.
OnePlus
वनप्लस ही एक चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. वनप्लस आपल्याला उत्कृष्ट डिझाईन केलेले हेडफोन आणि वापरण्यास अतिशय आरामदायक अनुभव देते. वजन खूपच कमी आणि वापरण्यास फोल्डेबल असलेले सोपे हेडफोन्स उपलब्ध आहेत. बिल्ट इन (DAC) डीएसीसह ऑडिओ गुणवत्ता खूप चांगली मिळते.
BoAT Bluetooth
BoAT या इंडियन कंपनीची स्थापना नोव्हेंबर 2013 मध्ये झाली. बोट हेडफोन सर्वोत्तम किंमतीच्या श्रेणीत, स्टायलिशमध्ये चांगले आहेत. ते आपल्याला कमी किंमतीच्या श्रेणीमध्ये स्पीकरसह उत्कृष्ट ऑडिओ गुणवत्ता देत आहेत. 2 हजार रुपयांपर्यंत हे सर्वोत्कृष्ट वायरलेस हेडफोन आहेत.
JBL
जेबीएल (JBL) ही अमेरिकन कंपनी आहे जी ऑडिओ उत्पादनांची निर्मिती करते. लाउडस्पीकर आणि हेडफोन्ससह जेबीएल आपल्याला परवडणारी कमी किंमतीत ब्लूटूथ हेडफोन देते. जेबीएल ऑडिओ उद्योगातील सर्वात मोठी आणि नामांकित कंपनी आहे. त्यामुळे हेडफोन घेताना याचा विचार देखील केला जातो.