नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. यापूर्वी कीबोर्ड असलेले फोन्स बाजारावर होते. परंतु, टचस्क्रीन फोन येताच कीबोर्ड असलेले फोन्स मागे पडू लागले. विशेष म्हणजे यामागे ॲपलच्या पहिल्या आयफोनचा सर्वांत मोठा वाटा आहे.
आता बाजारात कीबोर्डचे पुनरागमन होणार असल्याचे दिसत आहे आणि त्याची सुरुवात देखील आयफोनपासून होणार आहे. कारण 2024 मध्ये कीबोर्ड असलेला आयफोन वापरता येईल. म्हणजे तुम्हाला टाईप करण्यासाठी आयफोनच्या स्क्रीनवर टॅप करण्याची गरज नाही. तुम्ही पीसी कीबोर्डप्रमाणेच टाईप करून आयफोनचा वापर करू शकणार आहात. कारण आयफोन केस आता उपलब्ध झाले आहे.
हा केस फोनच्या यूएसबी टाइप सी पोर्ट किवा लाइटनिंग पोर्टशी कनेक्टेड असेल. हा केस थेट फोनमधून पॉवर बॅकअप घेईल. तसेच हा आयफोन 15 प्रोमध्ये फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. तसेच वायरलेस चार्जिंग देखील वापरता येईल. हा केस ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.
क्लिक टेक्नॉलॉजीने नवीन आयफोन केसची घोषणा केली असून, ज्यात बिल्ट इन कीबोर्ड बटन दिले जातील. याला क्लिक टू असे नाव देण्यात आले आहे, ज्याची किमत 139 डॉलर म्हणजे सुमारे 11,555 रुपये असणार आहे.