नवी दिल्ली : सध्या टेक मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार, कंपनीकडूनही विविध फोन्स आणले जात आहेत. त्यात क्वालकॉम लवकरच आपला नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर लाँच करणार आहे. कंपनी आपला पुढील फ्लॅगशिप प्रोसेसर 21 ऑक्टोबर रोजी लाँच करेल, असे सांगितले जात आहे. ज्याचे नाव Snapdragon 8 Elite असू शकते.
Xiaomi हा फोन बेस्ट प्रोसेसरसह लाँच केला जात आहे. दरवर्षी कंपनी Qualcomm च्या फ्लॅगशिप प्रोसेसरसह आपले प्रीमियम डिव्हाइस लाँच केले जात आहेत. यावेळी कंपनी Xiaomi 15 सीरीज लाँच करेल, जो Qualcomm च्या प्रोसेसरसह मिळणार आहे. कंपनी या महिन्याच्या अखेरीस लाँच इव्हेंट आयोजित करेल, असे म्हटले जात आहे. हा फ्लॅगशिप प्रोसेसर OnePlus 13 आणि iQOO 13 मध्ये देखील पाहायला मिळेल.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाणार आहे. Xiaomi, OnePlus आणि iQOO चे नवीन फोन्स या महिन्यात आणले जाणार आहेत. iQOO 12 कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केला होता. तर OnePlus 12 कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये लाँच केला होता.