नवी दिल्ली : सध्या विविध सोशल मीडिया अॅप टेक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात काही व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहेत तर काही चॅटसाठी. WhatsApp सह Instagram चे युजर्सही जास्त आहेत. जर तुम्हाला WhatsApp वरून Instagram चे Reels पाहायचे असतील तर हे अगदी सोपं आहे. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
WhatsApp वर Reels शोधता येतात आणि मग तुम्हाला आवडलेली Reels तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला WhatsApp वरून Reels बघायचे असतील तर आधी तुमचे ॲप उघडा. तुमचा मेटा आयकॉन ॲपवर दिसेल. Android आणि iPhone मध्ये त्याची प्लेसमेंट वेगळी असू शकते. काही लोकांना हे चिन्ह तळाशी दिसेल, तर काहींना ते थोडे वर दिसेल. मेटा आयकॉनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन यूजर इंटरफेस तुमच्यासमोर येईल. मग तुम्हाला सहमती (Agree) दर्शवावी लागेल. Show Me Reel या पर्यायावर क्लिक करा. यानंतर Meta AI तुम्हाला 4 ते 5 Reel दाखवेल.
Meta AI ने दाखवलेले Reel तुम्हाला समजत नसल्यास, आणखी कमांड द्या. तुम्हाला टेक कॅटेगरीवरील Reels पाहायच्या असतील तर कमांड द्या. जर तुम्हाला मोबाईल अनबॉक्सिंगवर Reel पाहायची असेल तर त्याची कमांड द्या. लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा मेसेज चॅटबॉक्समध्ये लिहायचा आहे. Meta AI तुम्हाला Reel दाखवत राहील.