नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच झाले आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Honor ने आपला X60 सीरीजचा फोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीने या सीरीजमधील दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने Honor X60 आणि Honor X60 Pro हे दोन फोन्स आणले आहेत.
Honor चे हो दोन फोन्स चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही फोनमध्ये 108 MP प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 7025-Ultra प्रोसेसर दिला आहे. तर प्रो-व्हेरियंटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर उपलब्ध आहे. Honor X60 मध्ये 6.8-इंचाचा TFT LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7025-Ultra प्रोसेसरसह येतो. यात 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा पर्याय आहे.
Honor X60 Pro मध्ये तुम्हाला 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा पर्यायही मिळेल. हा स्मार्टफोन 18 हजारांपर्यंत मिळू शकणार आहे.