नवी दिल्ली : सध्या Google Photos चा वापर वाढला आहे. कंपनीकडून अनेक बेस्ट असे फीचर्सही आणले जात आहेत. Google Photos हे गुगलचे इन-हाउस ॲप आहे आणि स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेलं असतं. आता हे ॲप आणखी चांगले होणार आहे. जर कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वापरून फोटो एडिट करत असेल तर हे ॲप तुम्हाला त्याची माहिती देईल.
Google त्याच्या Google Photos ॲपमध्ये फोटो एडिटिंगमध्ये AI च्या वापराबाबत पारदर्शकता वाढवण्यासाठी पावले उचलत आहे. पुढच्या आठवड्यापासून, मॅजिक एडिटर आणि मॅजिक इरेजर सारख्या AI Based चा वापर करून फोटो Edit केल्यावर युजर्संना त्याची माहिती मिळू शकणार आहे.
कंपनीने एका ब्लॉग म्हटले आहे की, पारदर्शकता आणखी सुधारण्यासाठी Google Photos मध्ये AI Edit कधी वापरली जातात हे पाहणे सोपे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी, या AI साधनांसह Edit केलेल्या इमेजमध्ये ‘इंटरनॅशनल प्रेस टेलिकम्युनिकेशन कौन्सिल’ (IPTC) मानकांवर आधारित मेटाडेटा समाविष्ट होता, जे AI बदल दर्शविते. पण, आता ही फोटोंबद्दलची सर्व माहिती फाईलचे नाव, स्थान आणि बॅकअप स्थिती यांसारखी माहिती मिळू शकणार आहे.