पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या फिटनेस बँडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात Whoop फिटनेस बँड खूप वेगळा आहे, जो जेवणापासून झोप आणि रिकव्हरीपर्यंतची संपूर्ण माहिती देतो. त्यामुळे हा बँड वापरणाऱ्याला फिट ठेवण्यास मदत मिळते.
सध्या जवळपास सर्वच सेलिब्रिटी अॅप्पल वॉचचा वापर करतात. परंतु, विराट कोहली हा Whoop या फिटनेस बँडचा वापर करतो. या बँडमध्ये कोणतीही स्क्रीन म्हणजे डिस्प्ले नसतो. त्यामुळे हा कोणत्याही स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडसारखा दिसत नाही. याला अमेरिकन कंपनी Whoop बनवते. हा एका स्ट्रॅपसारखा दिसतो. यामध्ये पाच सेन्सर दिले जातात. हा बॅटरी पॉवर्ड असून, यामध्ये 5 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते.
हा फिटनेस बँड पेअर करावा लागतो. त्यानंतर अॅपमधून फिजिकल हेल्थची माहिती मिळवता येऊ शकणार आहे. या फिटनेस बँडमध्ये माहिती मिळते की तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी किती ट्रेनिंग आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रेनिंग लोड आणि स्लीप क्वॉलिटीची माहिती मिळवता येते.
तसेच युजरला हार्ट रेट, तापमान मूव्हमेंट, स्किन कंडक्टिव्हिटीची माहिती मिळते. यामध्ये 5 एलईडी आणि 4 फोटोडायोड देण्यात आले आहेत, जे अचूक डेटा देण्याचे काम करतात, असा कंपनीकडून दावा केला जातो.