मोबाईल सहज चार्ज करता येतो. तुम्ही फोनला यूएसबी पोर्टमध्ये लावून चार्ज करू शकता अथवा कार चार्जरच्या मदतीने मोबाईल चार्ज करू शकता. पण कारच्या प्रवासादरम्यान लॅपटॉप कसा चार्ज करावा, असा प्रश्न अनेकांच्या मनात पडतो. पण त्याचं उत्तरही सोपं आहे. आज आम्ही तुम्हाला त्याचीच एक पद्धत अर्थात ट्रीक सांगणार आहोत.
कारमध्ये लॅपटॉपवर काम करत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी संपली. काम महत्त्वाचे असेल तर लॅपटॉप कसा चार्ज करावा? तर अशावेळी तुम्हाला अगोदरच तयारी करावी लागेल, त्यासाठी कार चार्जर खरेदी करावा लागणार आहे. लॅपटॉप चार्ज झाल्यावर, काम संपल्यावर हे चार्जर कारमध्येच ठेवा. म्हणजेच प्रत्येकवेळी त्याचा तुम्हाला वापर करता येईल.
हे चार्जर तुम्हाला ओव्हरलोड प्रोटेक्शन, ओव्हर हिटिंग प्रोटेक्शन, कमी दाबाच्या विद्युत पुरवठा, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनही देते. त्यामुळे चार्जर तुम्हाला ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन तसेच कारमध्ये चार्जिंग करताना लॅपटॉपला कोणताही धोका नसतो. लॅपटॉपला बिनधास्तपणे कारमध्ये चार्जिंग करता येते आणि तुमचे काम पण थांबत नाही.